महाराष्ट्र

दिशा सालीयन प्रकरण ; राणे पिता पुत्राची हायकोर्टात धाव

Share Now

दिशा सालियन बदनामीप्रकरणी गोत्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी राणे पिता-पुत्राने याचिकेद्वारे केली आहे.

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणाबाबत कोणतीही ठोस माहिती नसताना राणे पिता-पुत्राने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप केले होते. मात्र यामुळे दिशाच्या कुटुंबीयांची बदनामी होत असल्याने तिच्या आईवडिलांनी मालवणी पोलिसांना बदनामी रोखण्यासाठी विनंती केली तसेच महिला आयोगानेही याची दखल घेत पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात आयपीसी २०११, ५००, ५०४, ५०९, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणे पिता-पुत्राने अॅड. लोकेश झांडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *