पंजाबच्या विद्यमान मुख्यमंत्र्याचा पराभव , मोबाइल रिपेअरचं काम करणाऱ्याने केला
पंजाबमधील जनतेने काँग्रेसला नाकारत आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. केजरीवाल यांच्या आपच्या लाटेत काँग्रेस आणि भाजपसह इतर स्थानिक पक्षांच्या नौका बुडाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे.
मोबाइल रिपेअरचं काम करणाऱ्याने हरवले –
चरणजीत सिंह चन्नी यांना चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. भदौर मतदारसंघातून आपच्या लाभ सिंह उगाके यांनी चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. ते फक्त १२ वी पास आहेत. लाभ सिंह उगाके मोबाईल रिपेअरचं काम करतात. त्यांचे वडिल ड्रायव्हर आहेत. तर आई स्वीपर आहे. २०१३ पासून लाभ सिंह उगोके आप पक्षासोबत जोडले आहेत. विजयानंतर लाभ सिंह उगाके म्हणाले की, ‘चन्नी यांना भदौर मतदारसंघाबाबत काहीही माहिती नाही. या मतदारसंघात ७४ गावे येतात. या गावातील सर्व अडचणी मला माहित आहे. ही गावेच माझा परिवार आहेत. चन्नी यांना भदौर मतदार संघातील दहा गावांची नावेही माहित नाहीत. भदौर चन्नी यांच्यासाठी फक्त एक मतदारसंघ आहे.’