मोठी बातमी ; पंजाबचे माजी मुख्यमंत्री पराभूत
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचं जवळपास निश्चितच झालं आहे. आपनं जवळपास ९० जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा पराभव म्हणावं लागले . काँग्रेस केवळ १८ जागांवर आघाडी आहे. निवडणूक निकालांतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पराभूत झाले आहेत. पटियाला मतदार संघातून अमरिंदर सिंह यांचा पराभव झाला आहे. पटिलायामध्ये आम आदमी पक्षाचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह तब्बल १४ हजार मतांनी पराभूत झाले आहेत. आपचे उमेदवार अजीत पाल सिंह कोहली यांना जवळपास १४ हजार मतांनी विजयी झाले . दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह हे ४ वर्षांहून अधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. नंतर कॅप्टन अमरिंदर यांनी स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस स्थापन केला आणि भाजपशी युती केली. कॅप्टन यांनी दावा केला होता की, आपण अनेक जागांवर निवडणूक जिंकू. पण प्रत्यक्षात मात्र मोठ्या फरकानं पराभूत झाले आहेत.