उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडे जनतेचा कल तर काँग्रेसचा सुपडा साफ

देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाने आतापर्यंत शतकी खेळी केल्याचे समोर येतेय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली.

भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत.

येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला २०२ जागांची गरज आहे. उत्तर प्रदेश मध्ये भाजप २६४ तर सपा १२५ जागेवर आघाडीवर असून बसपा आणि काँग्रेसने दुहेरी आकडा देखील पार करू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *