गोव्यात शिवसेनेचा फ्लॉप शो ; काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे कारण महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घालून प्रतिष्ठा पणाला लावली होती.
गोव्यात सुरुवातीचे सर्व कल हाती आले असून आतापर्यंत गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढाई सुरु असल्याचं समोर येतेय .सुरुवातींच्या कलांमध्ये भाजप १८, काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. तर मगोप-तृणमूल ७ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर चार जागांवर आघाडीवर आहेत. प्रतिष्ठेची लढाई केलेल्या शिवसेनेला मात्र या कलांमध्ये कुठंही स्थान नसल्याचं समोर आलं आहे. गोव्यातील निवडणूक शिवसेनेनं प्रतिष्ठेची बनवली होती. तसेच भाजपसह सर्व पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी गोव्यात प्रचाराची धुरा सांभाळली होती. भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या चांगलीच चुरस दिसून येत आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत. सोबतच अपक्ष उत्पल पर्रिकर देखील पिछाडीवर आहेत. तर सुधीन ढवळीकर आघाडीवर आहेत. शिवसेनेने अद्याप खातंही उघडलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *