महाराष्ट्रराजकारण

केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या प्रचार यंत्रणाचं – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची टीका

Share Now

आज आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केलं जात असून महाविकास आघाडीकडून कारवाईचा निषेध केला जात आहे.

या पार्श्वभूमवीर आयकर विभागानं छापा टाकलेले राहुल कना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून हे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण असल्याचं ते म्हणाले आहेत.

राहुल कनाल आणि संजय कदम यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापे टाकल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून खोचक शब्दांत निशाणा साधला होता. “राहुल कनाल…संजय कदम.. दोघांना आता प्राप्तीकर विभागाच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. नाईटलाईफ गँगच्या सदस्यांना आता रात्रीची झोप लागणार नाही. ये रात की सुबह नही!” असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी भाष्य केले असून भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटू लागल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रावर आधीही अशी आक्रमणं झाली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असं समजलं आणि महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटायला लागली, तेव्हापासून हे सुरू आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

निवडणूकीपूर्वी उत्तर प्रदेश, हैदराबाद आणि पश्चिम बंगालमध्ये देखील असंच केलेलं. आता महाराष्ट्रात निवडणुका येत आहेत, म्हणून इथेही तसंच करत आहेत. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या प्रचार यंत्रणाच झालेल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही. ही तर भाजपाची प्रचार यंत्रणाच आहे. लोकशाही राहिली कुठेय?” असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *