बहुचर्चित “झुंड” आज प्रदर्शित

बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपट ४ मार्च म्हणजे आज प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट नागपूर शहरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय बारसे यांनी २१ वर्षांपूर्वी नागपुरात कलम सॉकर म्हणजे झोपडपट्टी फुटबॉलची सुरुवात केली होती.

झोपडपट्टीतील भागात वाढणारी मुलं वाईट सवयीच्या आहारी जाऊन, गुन्हेगारीकडे वळतात ही बाब लक्षात घेऊन विजय बारसे सरांनी २००० साली स्लॅम सॉकरची संकल्पना अस्तित्वात आणली. फुटबॉल खेळाच्या या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध फुटबॉलपटू बनवता येईल. तसेच योग्य वळण लावत गरीब कुटुंबातील मुलांना नवी संधी उपलब्ध करून देता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या कामाला सुरुवात केली.

नागपूर शहरातील बोखारा भागातील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले तसेच जवळच्या शाळेत शिक्षणाची सोय करून निवासी अकॅडमी सुरू केली. क्रीडा आणि अभ्यास दोन्ही प्रकारात गरीब मुलांना संधी त्यांनी उपलब्ध करून दिली.

स्लॅम सॉकरचा विस्तार एवढा वाढला की विदर्भ त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्लॅम सॉकर पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *