मोठी बातमी ; नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ
मनी लॉन्ड्रींग प्रकरणात नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीने कोठडी सुनावली होती. आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने मलिक यांची चौकशी अपूर्ण राहिली होती असा युक्तिवाद ईडीने केला. यामुळे न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली.
मुंबई सत्र न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी यांना वाढवून दिली आहे. तपास यंत्रणेने सहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत कस्टडी दिली आहे . त्यात २५ ते २८ फेब्रुवारी नवाब मलिक यांची प्रकृती खराब असल्याकारणाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, या कारणामुळे त्यांच्या चौकशी होऊ शकली नाही.
नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध दाऊद इब्राहिम सोबत होते. असा युक्तिवाद करून ईडीने न्यायालयात करत मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी न्यायलायत केली होती.