अधिवेशानाचं कामकाज सुरु होताचं का झालं स्थगित ?
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. भाजपानं आक्रमक भूमिका घेतली असून नवाब मलिक हाय हायच्या घोषणा तर भाजपानं दिल्याच. त्याचबरोबर जुते मारो सालों को, अशी आक्षेपार्ह घोषणाबाजीही भाजपाच्या आमदारांनी केलीय.
भाजपा नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसदेखील सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी यावेळी केली. शोकप्रस्तावानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं आहे. विधानपरिषदेचं कामकाजदेखील दिवसभरासाठी स्थगित झालं आहे.