राज्यपाल अभिभाषण न करता निघाले ; आमदार संजय दौंड यांनी शीर्षासनकरून केला निषेध
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अभिभाषण न करताच राजभवणाकडे निघाले परंतु त्यानंतर सत्ताधार्यांचा आक्रमक पवित्रा बघायला मिळाला. सभागृहात घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध केला.
आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन अर्थात खाली डोकं आणि वर पाय करत राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध व्यक्त केला.तसेच आज राज्यपालांचे अभिभाषण होतो परंतु राज्यपालांनी भाषण केले नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरण्याच्या कारणाने त्यांच्या विरोधात गोंधळ घातल्याचे संजय जाऊन यांनी सांगितले.