अर्थसंकल्पीय अधिवेशन ! राज्यपाल अभिभाषण न करताच निघाले..
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांनी काल चहापानाला बहिष्कार टाकत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती आज सकाळीच नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी विधान भवनाच्या पायर्यांवर भाजप आक्रमक झाल्याची बघायला मिळाले.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे भाषण झाल्यानंतर अधिवेशनाला सुरुवात होणार होती परंतु शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपालांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे राज्यपाल भगत सिंग कोशारी यांनी भाषण थांबवलं आणि निघाले .
महा विकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरूवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले.