चहा पानावर विरोधकांचा बहिष्कार ; मलिकांनी राजीनामा द्यावा – विरोधकांची मागणी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी बनल्याचे दिसून आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना अजित पवारांवर टोला लगावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही त्यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत कारण अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही पण आधार कनेक्शन कापले जात आहेत.
मनी लँडिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक झालीच पाहिजे. दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला वाचण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच मुंबईच्या खुन्याशी व्यवहार खपवून घेणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केली.
मला आश्चर्य वाटतं या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत सरकार मुंबईच्या सोबत सोबत व्यवहार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे हे अतिशय दुर्दैवी आहे असा टोला देखील त्यांनी लगावला.
म्हणून आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहोत मुंबईच्या गुन्ह्यांची व्यवहार कुठल्याही परिस्थितीत मान्य केले जाऊ शकत नाही यामुळे भारतीय जनता पार्टी ठामपणे राजीनामा झाला पाहिजे याकरता सभागृहात संघर्ष करेल.