बाप बेटे आणि इतरही काही लोक तुरुंगात जाणार – खा. संजय राऊत
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असून आर्यन खानचे कोणत्याही ड्रॅग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे एनसीबीच्या हाती न लागल्याचे एसआयटीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणावरून एनसीपीं बनाव केल्याचं उघड झालं आहे असे संजय राऊत म्हणाले.
त्याचबरोबर ते मोठ्या वार्ता करतात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात ते सर्व जेलमध्ये जाणारच महाराष्ट्र सातारा येथील तपास यंत्रणा आणि पोलीस अनेक गोष्टींचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला संजय राऊत यांनी सांगितलं.
ज्यावेळी मी माझी पहिली पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं होतं की बाप बेटे जेलमध्ये जाणार आतापर्यंत तुम्ही इतरांना धमक्या देत होता, त्यांना जेलमध्ये पाठवीन, मग तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी धावपळ का करताय ?
आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही. कोणत्या गुन्ह्यातर्गत गुन्हा दाखल होणार याची स्पष्टता नाही. पीएमसी बँक घोटाळ्यात तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल तर सांगा असे सरकारी वकिलांनी युक्तिवाद केल्याचं मी आत्ता वाचलं अशी प्रकरणं मी पाहत नाही फार किरकोळ प्रकरण आहे. मी जे साडेतीन म्हणालो, तुम्ही मोजत राहा. असे देखील संजय राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
तसेच साडेतीन लोकांची नावे जाहीर केली तर अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतसं तुम्हाला समजेल. असे माझे शब्द लिहून ठेवा हे बाप बेटे आणि इतरही काही लोक आहे की मोठमोठ्या गप्पा करतात. ते सगळे तुरुंगात जाणार आहेत एक प्रकरण नाही अनेक प्रकरणे आहेत. यामध्ये बाप बेटी जेलमध्ये जाणार आहे. त्यांच्यासोबत अनेक अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणांनी घोटाळे करून ठेवले आहेत. यातही काही प्रकरणे पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्त केले आहेत काही पुराव्यांसह माझ्याकडे आहेत. अधिवेशन संपलं की मी समोर येऊन सांगेल. अधिकाऱ्यांना वाटतं की आपल्या राज्य आहे ते भ्रमात आहे.