संभाजीराजेंची तबेत बिघडली मात्र राजेंची उपोषणावर ठाम
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाचे अस्त्र पुकारणारे छत्रपती संभाजी राजे यांची आज तब्येत बिघडली आहे.
डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिलाय. मात्र, संभाजीराजे छत्रपती उपोषणावर ठाम असून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे वर्षा बंगल्यावर राजे यांच्या उपोषणाबद्दल बैठक सुरू झालीय. या बैठकीसाठी यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीत आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, राजेंनी आता निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे डॉक्टरांसह सारेच चिंतेत आहेत.
डॉक्टरांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या साखरेची पातळी तपासली. रक्तदाब तपासला. यात राजे यांचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, राजे सध्या उपोषणावर ठाम आहेत.