औरंगाबादच्या चंपा चौकात टवाळखोरांचा राडा, गाड्याची केली तोडफाड

औरंगाबाद शहरातील चंपा चौक परिसरात गुरुवारी रात्री गुंडांनी हातात तलवारी घेऊन काही वाहनांची तोडफोड केली.
तोडफाड करणाऱ्यापैकी एक खुनाच्या गुन्ह्यातून आठ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेल्या अशफाक पटेल या गुन्हेगाराने दोन ते तीन जनसोबत चंपा चौकात हा प्रकार केला. हातात तलवारी घेऊन आलेले हे टवाळखोर दुकाने बंद करण्याची धमकी देत होते.
हातात असलेल्या तलवारींनी ते वाहनांची तोडफाड करू लागले. या घटनेत दोन वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे व्यावसायिकांनी घाबरून दुकाने बंद केली, काहींनी दुकाने तशीच सोडून पळ काढला. या घटनेमुळे गुरुवारी रात्री परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तणाव निवळला, पण शहराती गुंडगिरीनं मर्यादा ओलांडल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले.

गुरुवारी रात्री ९ वाजता चंपा चौकातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरु होती. दुकानात ग्राहकांची गर्दी होती तर रस्त्यावरही अनेक वाहनांची ये-जा सुरु होती. तवेढ्यात पटेल आणि त्याच्या टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकाने बंद करण्याच्या धमक्या सुरु केल्या.

तलवारींनी वाहनांवर वार करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दीपक गिऱ्हे, निरीक्षक अशोक गिरी, विनोद सलगरकर, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, रोहित गांगुर्डे यांच्यासह दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हे टोळकं निघून गेलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *