धावत्या टेम्पोला आग, बारावीच्या प्रश्नपत्रिका जाळून खाक
नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात धावता टेम्पोला अचानक पणे आग लागली ही घटना बुधवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी घडली. या टेम्पो मधून भोपाळ येथून पुणे विभागीय परीक्षा मंडळाच्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या या दुर्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.
चंदनापुरी घाटात टेम्पोने एम पी 36 एच 07 95 पाठीमागील बाजूने अचानक आग लागली आग लागल्याने चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबविला चालक मनीष चौरसिया आणि सुपरवायझर रामविलास राजपूत यांना ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही यात 878 प्रश्नसंच बघते जळाले अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी गेले संगमनेर नगरपरिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अशोक भोसले, विभागीय मंडळाचे विभागीय सचिव अनुराधा ओक ,सहाय्यक सचिव महाजन जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक खडूस यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर या झालेल्या प्रश्नपत्रिका दुसऱ्या खाजगी वाहनांद्वारे देण्यात आल्या.