नवाब मलिक यांना जामीन कधी मिळू शकतो ?
राष्ट्रवादी काँगेसचे नवाब मलिक याना ईडीकडून अटक करण्यात आली, या अटकेवर सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीने जर नवाब मलिक यांच्या विरोधात सबळ पुरावा दिला तर न्यायालय ईडी कस्टडी द्यायची की नाही ठरवेल. तपास यंत्रणेने कोणत्या प्रकारचा पुरावा गोळा केला आहे. त्याच्या आधारे ईडी कस्टडी किंवा न्यायालयीन कस्टडी होऊ शकते.
न्यायालयीन कस्टडी मिळाली तर जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ईडी कस्टडी मिळाली तर मात्र काही दिवस त्यांना ईडी कस्टडी मध्ये राहावे लागू शकते असे उज्वल निकम म्हणाले.