काही झालं तरी ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणू – खा संजय राऊत
आज सकाळीच नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर जोरदार टीकेचे बाण सोडले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांचे पोलखोल करत राहू तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणू असे माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हटले. नवाब मलिक असतील किंवा माझ्यासारखे खूप लोक आहेत जे सातत्याने बोलत आहेत असा त्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडुन काढत आहे. सत्य बाहेर काढत आहे. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी किंवा सीबीआय लावल जात आहे.
नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीने अटक केली, चौकशी होईल. आम्ही वाट पाहतोय नक्कीच संध्याकाळी ती घरी येतील. आत्ताच माझे वरिष्ठ स्तरावर बोलणे झाले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात, चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची पण चौकशी कशी करत आहेत.वीस वर्षांपूर्वीचे प्रकरण यावर आता चौकशी करत आहेत. अशी असा सवाल संजय राऊत यांनी केला.