क्राईम बिट

मुलीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आईनेच केली मुलीची हत्या

Share Now

माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली. चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेने आपल्या मुलीची सुपारी देऊन हत्या केली. याप्रकरणी मृत महिलेच्या आईसह तिला मदत करणाऱ्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना राजुरा तालुक्यातील मुन्नी गेट येथे राहणाऱ्या नातेवाइकांनी संबंधित महिलेला विहिरीत ढकलून हत्या गेली.

सैदा बजावत असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून सैदा तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी आहे. सैदाचे अनैतिक संबंध असल्याची शंका तिच्या आईला आली होती त्यासोबतच गर्भपात करण्याच्या बहाण्याने तिला आईने राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील नातेवाईकाकडे पाठवलं त्याच नातेवाईकाने तीस हजार रुपये घेऊन तिची हत्या केली.

18 फेब्रुवारीला एका अज्ञात महिलेचा राजुरा तालुक्यातील कविता पेठ येथे विहिरीत मृतदेह आढळून आला. या परिसरात अज्ञात असलेल्या महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दोन्ही राज्यात तिचे फोटो पाठवले याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता तिच्या आईने अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या समोर आली.या प्रकरणाचा पुढील तपास विरुर पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *