एसटी महामंडळाच्या विलीनकरणाबाबत आज महत्त्वाची सुनावणी
उच्च न्यायालयात एसटी महामंडळाच्या विलीनकरणाबाबत आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे.राज्य सरकारच्या समितीचा अहवाल सादर झाला असून या शिफारशी कोणत्या आहेत याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
आपल्या मागणीसाठी एसटी कर्मचारी शंभर दिवसांपेक्षा अधिक दिवस संपावर गेले असून त्यामुळे एसटी महामंडळाचा तब्बल सोळाशे कोटी रुपयांचा नुकसानही झाले.
संपाचा तिढा कायम असताना कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या बाबींवर न्यायालयात काय निर्णय होईल याकडे कामगारांसोबत प्रवाशांचाही लक्ष लागून आहे.
आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेलं एसटी कामगारांच आंदोलन आहे. यात अनेक राजकीय पक्ष आणि संघटनेच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. शाळा कॉलेज सुरू झाले असून यात सामान्य माणसाला देखील प्रवासासाठी अडचण निर्माण झाली आहे.