महाराष्ट्र

राज्य अनलॉक होण्याची शक्यता, दोन दिवसात निर्णय होणार ?

Share Now

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत होती, वाढत्या रुग्ण संख्येला आळा बसावा यासाठी राजय्त निर्बध लावण्यात आले होते. मात्र सध्या कोरोना रुग्णाची संख्या आता कमी असल्याने पुन्हा एकदा राज्य अनलॉक होणार आहे. पुढील दोन दिवसात निर्बंध शिथिल करण्याबाबत आढावा बैठक घेण्यासाठी मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. परंतु राज्य अनलॉक करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे.

दोन दिवसानानंतर काय निर्णय होईल ?

मॉल्स, चित्रपटगृह आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवेश देताना लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहे. यात शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक केले आहेत. यामध्ये देखील शिथिलता मिळायची शक्यता आहे.
ब्युटी सलून आणि केश कर्तनालय पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी द्यायची शक्यता
मनोरंजन व उद्याने जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी देण्याची शक्यता
सध्या नाट्यगृह चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत तेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शक्यता
हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृह यांनाही पूर्ण क्षमतेने आणि नियमित वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.
ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत. त्यांनाच प्रवेश देण्याच्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला फटकारले आहे. त्यानंतर आता राज्य सरकार तातडीने यावर ती निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यासोबत अनेक निर्बंध शिथिल करून राज्य सरकार निर्बंध मुक्तीच्या दिशेने निर्णय येत्या दोन दिवसांमध्ये घेण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *