महाराष्ट्रराजकारण

समांतर पाणी योजना शिवसेनेमुळे अपूर्ण देवेंद्र फडणवीस यांची टीका

Share Now

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावतीने ग्रामीण संगोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर तीव्र शब्दात टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक शासकीय योजनांद्वारे ग्रामीण भागातील लोकांना रोजगारासाठी संधी निर्माण केली, असून काही लोक नुसतेच मराठवाड्याच्या विकासाच्या नावावर भाषण करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

औरंगबाद शहराच्या समांतर पाणी योजनेवर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. शहरातीच्या १६८० कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेवरून भाजप आधीच आक्रमक झाली आहे. कालच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या योजनेचे काम वेळेत पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला होता. याच मालिकेत पुढे भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबाद शहराने शिवसेनेला ओळख दिली. इथली नवी पाणी योजना आम्ही आणली. मात्र शिवसेनेने तीदेखील पूर्ण होऊ दिलेली नाही. इथल्या शेतकऱ्यांसमोर अडचणी आल्या, मात्र या सरकारने त्यांना मदत केली नाही. आमच्या सरकारने प्रत्येक संकटात शेतकऱ्यांना मदत केली, मात्र आतचं सरकार हरवलं आहे.

देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या विकासावर देखील भाष्य केले. आमच्या मनात मराठवाडा आहे, मात्र काही लोकांना मराठवाडा फक्त भाषणात आहे, आताचं सरकार हरवलं आहे, त्यांना मराठवाडा कुठे आहे हे माहित नाही. त्यांच्या मनात मराठवाडा नाही, वैधनिक विकास गेला. आम्ही मराठवाड्याचा विकास लक्षात घेऊन दुष्काळ भागात पाणी आणण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ घालवण्यासाठी वाटरग्रीड योजनेचा खून केला, हळूहळू विष देऊन मारलं.शेतकऱ्यांची विज कापली जात आहे, अनेक धनाध्य लोक वीजवील भारत नाही, मंत्री म्हणतात विज वापरली तर बिल भरावं लागेल, तुमची पगार दोन अडीच लाख आहे, तर ते सरकार बिल भरते तुम्हाला काय कळणार, सरकार तर्फे एक तरी प्रवक्ता सामान्य माणसाच्या शेतकऱ्यावर बोलला आहे का ? असा प्रश्न सत्ताधाऱ्यावर केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *