आमदार रमेश बोरणारे यांच्या अडचणीत वाढ भाजप महिला आघाडी आक्रमक आज ‘आयजी’ ना भेटणार
आ. रमेश बोरणारे यांनी महिलेला मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे. आ. रमेश बोरणारे याना लोकप्रतिनिधी असल्याचा विसर पडला आहे. यामुळे त्यांनी महिलेला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला हवी, आणि रमेश बोरणारेचा राजीनामा घेऊन कारवाई करावी अशी मागणी भाजप महिला आघाडी कडून होत आहे.या संदर्भात महिला आघाडीचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकाची भेट घेणार आहेत.
१८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांचा सत्कार केल्याचा राग आल्याने रमेश बोरणारे यांच्यासह १० जणांनी चुलत भाऊ आणि भावजायीस मारहाण केली यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.
आमदार झाल्यापासून रमेश बोरणारे तसेच त्यांचे समर्थकांची वागणूक बेजवाबदर राहिली आहे. तालुक्यातील गटबाजीच्या राजकारण देखील यांच्या आदमूठ स्वभाव असल्याने उद्भल आहे. वैजापूर तालुका पक्ष संघटनेत आजी आणि माजी असे दोन गट आहेत. त्यांच्या या दोन्ही प्रकरणामुळे पक्ष संघटनेला तसेच पक्षाची प्रतिमा देखील खराब होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणानंतर पक्ष काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.