अहमदाबाद बॉंबस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा
१३ वर्षांपूर्वी अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला आहे , या प्रकरणात दोषी दोषी असलेल्या तब्बल ३८ जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर ४९ जणांना दोषी ठरवलं होतं. त्यातील ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात सहा हजार कागदी पुरावे सादर करण्यात आले होते. बॉम्बस्फोट प्रकरनाच्या सुनावणीत आता पर्यंत नऊ न्यायाधीश बदलले आहे. त्याचबरोबर १११७ साक्षीदार जवाब नोंदवण्यात आले आहेत.
गुजरात विशेष न्यायालयाने निकाल देताना ७७ पैकी ४९ जण दोषी ठरवले आहेत. तसेच २८ जणांची निर्दोष सुटका झाली .
२६ जुलै २००८ साली गुजरात अहमदाबाद मध्ये एका तासात २१ बॉम्बस्फोट झाले होते. याचा निकाल १३ वर्षानी लागला आहे. शहरातील २१ वेगवेगळ्या ठिकाणी हे बॉम्ब स्फोट झाले होते.
या बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद मध्ये १९ ठिकाणी तर कलोलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. वाहने आरोपीने नेल्याचे पुरावे देखील यात सापडले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था भंग करणे, गुन्हेगार कट रचणे असे आरोपी विरोधात पुरावे आहेत.