मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार ; मनपाने दिली नोटीस
शिवसेना आणि भाजप यांच्या राजकीय संघर्ष सुरू असताना दररोज होणारे आरोप-प्रत्यारोप त्यातआता मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली.
मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या जुहूच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याचा तपास करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यामुळे राणे विरुद्ध शिवसेना वाद होण्याची शक्यता आहे.
आज नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाची तपासणी करणार आहे. अशी नोटीस मुंबई मनपाकडून दिली. के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथक पाहणी करेल.
आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी तक्रार केली आहे. बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी दिली आहे.