न्यायालयाने दिले मंत्री अब्दुल सत्तारांच्या चौकशीचे आदेश, काय आहे प्रकरण ?
औरंगाबाद : शिवसेना नेते आणि राज्याचे महसुल मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सत्तारांनी सोयगाव-सिल्लोड विधानसभा निवडणूक २०१९ मधील नामनिर्देशन पत्रामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी २०१९ साली शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. यावेळी शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याची तक्रार एकाने केली आहे. या मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेयर्स, शैक्षणीक अर्हता यांची खोटी माहिती सादर केली म्हणून डॉ.अभिषेक हरदास आणि सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपल्ली यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सिल्लोड न्यायालयात संयुक्त याचिका दाखल केली होती. सदर याचिकेमध्ये न्यायालयाने तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकून सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत सत्तार यांच्या पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत.