Uncategorized

औरंगाबादच्या विकासासाठी ५०० कोटी मंजूर, पालकमंत्र्यांची माहिती

Share Now

मुंबई : राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ५०० कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या संबंधी माहिती दिली आहे.

जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व अन्य जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले होते. परिणामी जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी ५०० कोटीपर्यंत वाढविण्यात आला आहे. या निधी बद्दल पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *