राजाचं आगमन मूक पद्धतीने आम्ही स्वीकारणार नाही , प्रशासकाने वेळ बदलावा – विनोद पाटील
औरंगाबाद :- औरंगाबाद शहरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण १८ फेब्रुवारी शुक्रवारी रात्री १२ वाजता करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु त्यातदेखील निर्बंध घालून दिले आहेत. या निर्णयावर विनोद पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. राजाचं आगमन मूक पद्धतीने आम्ही स्वीकारणार नाही , प्रशासकाने वेळ बदलावा असं विनोद पाटील यांनी सांगितले.
प्रशासन रात्री १२ जरी स्मारकाचे उद्घाटन करणार असेल तरी ढोल ताशे आणि जल्लोष करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तसेच रात्री १२ वाजता या शहरातील माता भगिनी येऊ शकतील का.? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
राजकीय कार्यक्रमात गुन्हे दाखल होत नाहीत आणि शिवजयंतीत गर्दी झाली तर गुन्हे दाखल करण्याची धमकी, हे पटत का ? अशी टीका प्रशासनाच्या निर्णयावर केली आहे.
शिवभक्तांना प्रशासन व सरकारशी कुठलाही वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळे उद्घाटनचा वेळ बदलावा व शिवजयंती वर निर्बंध लादू नये. अशी मागणी त्यांनी केली असून शिवप्रेमींच्या सहनशक्तीचा अंत बघू नका,आम्ही मोठ्या थाटातच आमचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. [lock][/lock]