संजय राऊत यांचा डोळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर नारायण राणे यांची टीका
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे, संजय राऊत खासदार आहेत, संपादक आहे त्यांनी काय भाषा वापरावी. आम्ही शिवसेनेतुन आलो आहोत पण अशी भाषा वापरणार नाही. असे नारायण राणे म्हणाले.
संपादक म्हणून आले आलेले संजय राऊत आहे. राऊत यांचे जुने वृत्तपत्र नारायण राणे घेऊन आले होते. लोकप्रभा आणि मार्मिकमध्ये काम करून सामनात आल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत आरोप करतात त्यावरून त्यांना पत्रकर नाही, प्रवीण राऊत यांवच्या अटकेनंतर त्यांनी घबराट सुटली आहे.
त्यानंतर त्यांनी अलिबाग मध्ये जमीन घेतल्याचे सांगितले. संजय राऊत याचं लक्ष केवळ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. तुमची कुंडली माझ्या कडे असल्याचे देखील त्यांनी बोलून दखावले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत याना घेऊन जावं आणि विचारपूस करावी, अमित शहा आणि मोदींवर टीका करतात मात्र यांची लायकी काय आहे.?? अशी टीका राणेंनी केली.
संजय राऊत शिवसेनेत केवळ पद आणि पैशासाठी आले आहेत. त्याचसोबत अनिल परब याना देखील अटक होणार.
जनतेच्या प्रश्नाचे आणि विकासाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. लोकांचे प्रश्न सुटत नाही एसटी सम्प मिटत नाही. उद्धवजीना माहिती नाही
एक आरोप झाला तर घाम फुटतोय ईडी शी बोलू नको बिडी प्यायला लावतील.
शिवसेना भवनसाठी आम्ही काम केलंय, तुम्ही २५ वर्षानंतर आले आहात. कुणाच्या कान फडात तर मारली का.? त्यांनी केलेली आरोप बिनबुडाचे आहे.
सत्तते येण्यापूर्वी एकमेकांवर टीका करणारे आज मांडीला मंडी लावून बसले आहेत. अशी टीका मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.