खा.संभाजीराजेंच मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ तक्रार
मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केल आहे. तसेच ८ महिन्यांपूर्वी सरकारनं दिलेलं आश्वासन हवेत विरल्याची तक्रारही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
मराठा समाज हा देखील वंचित घटक आहे. २००७ पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं. मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,” याची देखील पूर्वसुचना त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली आहे.