जेष्ठ गायक बप्पी लाहिरी यांचे निधन
बॉलिवूड गायक बप्पी लाहिरी याच आज सकाळी दुःखद निधन झालं बप्पी यांनी त्याच्या अखेरचा श्वास घेतला. मागील एक महिन्यापासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
बप्पी लाहिरीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि निधन झालं. बप्पी लाहिरी यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
बप्पी दा ७० ते ८० च्या दशकात बॉलीवूड संगीतातील प्रयोगासाठी ओळखले जातात. त्यात त्यांनी पॉप संगीताचा टेम्पर ठेवला होता. डिस्को डान्सर या गाण्याने त्यांना खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती.
Bappi Lahiri was suffering from Obstructive Sleep Apnea & recurrent chest infection. He was hospitalised in Criticare Hospital, Juhu for 29 days with this. He recovered well & was discharged home on Feb 15: His doctor Dr Deepak Namjoshi (1/2) https://t.co/RpOVO3fkcE
— ANI (@ANI) February 16, 2022