अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त ठरला “या” तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा २२ दिवस होणार असून ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर केला जाणार आहे. प्रलंबित बिल आणि मागण्यावर पाच दिवस चर्चा होईल कोणाच्या कारणास्तव अधिवेशन मुंबईत होणार आहे.
दोन्ही सभागृहाचे सदस्य संख्या बघता नागपुरात बैठक व्यवस्था नसल्याने मुंबई अधिवेशन होईल या अधिवेशनात विदर्भावर अन्याय होणार नसून आज संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनात संदर्भात निर्णय घेण्यात आला.
अधिवेशन नागपूरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु, आज घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
या वर्षी महा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून किसन अर्थसंकल्प मांडणार आहे. मान्सून आणि हिवाळी अधिवेशन याचे कामकाज कमी दिवस चालले होते मात्र अर्थसंकल्पी अधिवेशन पूर्ण का चालायला हवे अशी विरोधकांची इच्छा आहे. ज्या पद्धतीने लोकसभेचे कामकाज चालतो त्यानुसार कुठलेही काम चालावं अशी भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
यामुळे यंदाचा अर्थसंकल्प अधिवेशन किती दिवस सांगणार कामकाज कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.