जालन्यातून बेपत्ता असलेले पोलीस निरीक्षक अखेर सापडले
जालना अँटी करप्शन ब्युरो चे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे तब्बल १३ दिवसांपासून बेपत्ता असलेले संग्राम चाटे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे होते.
२ फेब्रुवारी रोजी मित्राकडे जाऊन येतो असे सांगून बेपत्ता झालेले ताटे यांचा आज शोध लागला आहे. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून जालना पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी तीन पथके तयार केली होती, काल रात्री सातारा जिल्ह्यातील खंडाळा महामार्गावरवर असलेल्या टोलनाक्याजवळ आढळून आले त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
१३ दिवसांपासून बेपत्ता असलेले संग्राम ताटे यशवंत नगर भागातील घरून पत्नीला मित्राकडे जाऊन येतो असे सांगून निघाले होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही मोबाईल घरीच ठेवले होते, मात्र त्यानंतर संग्राम ताटे घरी परतलेच नाही. यामुळे त्यांच्या पत्नीने जालना शहरातील कदीम पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच त्यांना शोधण्यासाठी विशेष तीन पथके नेमण्यात आली होती .
घरा नजीकच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार संग्राम ताटे शहरातील मोतीतलाव जवळ आले तेथून ते लाल रंगाच्या गाडीने औरंगाबादच्या दिशेने गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. संग्राम ताटे यांचा शोध तर लागला आहे, मात्र काय घडलं होत की ताटे बेपत्ता होते याच उत्तर आणखी मिळालं नाही.