महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण…

Share Now

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आता संभाजीराजे हे आमरण उपोषण करणाहेत. मुंबईतील आझाद मैदानात ते उपोषणाला बसणार आहेत. येत्या २६ फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसणार आहेत. अशी मोठी घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, २००७ पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही. तसेच सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितल आहे. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या असून मराठा आरक्षणासाठी पुढील वाटचाल कशी असणार आहे याबाबतची दिशाही ते आज ठरवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *