अवैधरित्या नशेच्या गोळ्या औषधे विकणाऱ्यावर कारवाई करा – युवासेनेची मागणी

युवा सेनेतर्फे आज औषध अन्न प्रशासनाचे संचालक श्री काळेश्वर यांना अवैध रित्या नशेच्या गोळ्या औषधे विकणाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसापासून शहरांमध्ये काही तरुण नायट्रोजन, कोरेक्स ,फॅन्सीड्रिल, अल्फाझोरम ,लोमोटीन या औषधाचा उपयोग नशा करण्यासाठी करत आहेत . या नशेमध्ये नागरिकांना धमकावणे ,मारहाण करणे असे गैरकृत्य करीत आहेत अशाच नशेबाज टोल्याकडून खून करण्याच्या घटना ताज्या असतानाच पुंडलिक नगर भागात एका विद्यार्थ्याला जीव जाईपर्यंत मारहाण करण्याची घटना घडली आहे. अशा प्रकारच्या नशा येणाऱ्या औषधी गोळ्या अगदी कोवळ्या वयातील तरुणांनाही सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे जे लोक अशा गोळ्याची औषधाचे मागणी करतील त्यांच्याकडे डॉक्टरची चिठ्ठी असणे आवश्यक असतानाही या तरुणांना या औषधाचा पुरवठा कसा होतो, असा प्रश्न उपस्तित होतो . युवा सेनेतर्फे मागणी करण्यात आली आहे की अशा प्रकारच्या औषध गोळ्या पुरवठा करणाऱ्या एजन्सीची तपासणी करण्यात यावी जे लोक अशा प्रकारचे ड्रग्स घेण्यासाठी येतील त्यांच्या आधार कार्डची प्रत मेडिकल धारकांनी ठेवून घ्यावी व ज्या एजन्सी अथवा मेडिकल मधून गेल्या काही दिवसांमध्ये अशा गोळ्यांचा किंवा औषधांची सर्वात जास्त विक्री करण्यात आली असेल त्यांचे ऑडिट करून स्टॉक तपासण्यात यावा.

या प्रकारच्या मेडिकेटेड औषधाने नशा केल्यामुळे तरुणांचे शारीरिक व मानसिक नुकसान होत असून त्यामुळे समाजाचे स्वास्थ बिघडत चालले आहे. औषध प्रशासन चे संचालक श्री काळेश्वर यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून कारवाई करण्याचे आश्वासन युवा सेनेला दिले आहे . या शिष्टमंडळात युवासेना उपसचिव तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ युवा सेनेचे युवा जिल्हाधिकारी हनुमांजी शिंदे, जिल्हा समन्वयक संदीप लिंगायत ,शहर प्रमुख ज्योतीराम पाटील ,शेखर जाधव ,सागर खर्गे, सागर शिंदे अवधूत अंधारे ,यश पागोरे ,विशाल खंडागळे ,गणेश जोशी, तुषार साळुंके यांच्यासह युवा सैनिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *