चिकलठाणा ते वाळुज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा डीपीआर तयार करण्यास मंजुरी

औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ता  जालना रोड त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी चिकलठाणा ते वाळुज पर्यंत एकच उड्डाणपुल होणार आहे. या उड्डाणपुलाच्या बांधण्यासाठी डीपीआर तयार करण्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांनी मंजुरी दिली.

सध्या शहरात असलेले उड्डाणपूल चांगले असतील तर वापरण्यात येतील अन्यथा ते देखील पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.

गुरुवार दि १० रोजी औरंगाबाद शहर जिल्ह्यातील महामार्गांवर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी चिकलठाणा ते वाळुजपर्यंत उड्डाणपूल, नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे रुंदीकरण तसेच औरंगाबाद ते वैजापूर शिर्डी मार्गचे रुंदीकरण, आणि कन्नड घाटातील रुंदीकरण तसेच काही ठिकाणी बोगदे करण्यात यायला हवे अश्या मुद्द्यावर चर्चा केली.

या बैठकीत एनएचएआयहे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक आशिष आसाडी , बी. डी. ठेंगे , विभागीय प्रादेशिक अधिकारी अरविंद काळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *