राजकारण

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार, गंगापूर तालुक्यातील अनेक नेते रा. काँग्रेसमध्ये

Share Now

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका बघता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष विस्ताराला गती दिल्याचे दिसून आले. औरंगाबाद मधील पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील प्रभावी नेते राष्ट्रवादीमध्ये आणले.

याचा गंगापूर तालुक्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता कारण काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत आले. हा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला.

संजय जाधव गंगापूर शहरातील एक प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात कारण, गंगापूर नगर परिषदेवर नगराध्यक्ष म्हणून यांनी १५ वर्ष काम केला आहे. त्यासोबतच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद देखील त्यांनी भूषवले आहे.

त्यासोबतच नगरपालिकेचे कॉंग्रेसचे गटनेते सुरेश नेमाडे,
– नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे
– नगरसेवक अशोक खाजेकर
– नगरसेवक मोसिन चाऊस
– माजी नगरसेवक सचिन भवर
– गंगापूर बाजार समितीचे सहा माजी संचालक
– शरंगधार जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य
– युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश बारहाते
– अश्या अनके कार्यकर्त्यानी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे यामुळे आगामी निवडणुकीत रा. कॉग्रेसला याचा फायदा नक्की होण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *