शिवजयंती उत्सव साजरी करायची ऐपत नसेल तर आम्हाला सांगा – विनोद पाटील यांचं मनपाला आवाहन
आर आर फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी औरंगाबाद महानगर पालिकेला थेट आव्हान केलंय , जर शिवजयंती साजरी करण्याची मनपाची ऐपत नसेल तर मला सांगा.आम्ही सर्व शिवभक्त शिवप्रेमी आमच्या राज्याच्या जन्मोस्तवच खर्च उचलण्याची तयारी असल्याचे फेसबुक पोस्ट करून सांगितले आहे.
विनोद पाटील यांनी अशी पोस्ट का केली?
दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. क्रांतिचौकात सजावट साउंड सिस्टम याचा संपून खर्च मनपा करत असते. मात्र याची बिले वर्ष वर्ष भर थकवले जातात. हि बाब अपमानास्पद आहे, मनपाकडे इतर गोष्टीसाठी खर्च करण्यासाठी पैसे आहे. अशी तुका देखल त्यांनी केली आहे.
२०२० च्या शिवजयंतीच्या वेळी संतोष चांदरे याना (संतोष साऊंड अँड डेकोरेशन ) डेकोरेशनचे काम देण्यात आले होते मात्र अजूनही त्यांचं बिल देण्यात आलेलं नाही. यावर आर आर फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील आपल्या फेसबुक पोस्टमधून मनपाला आवाहन केलं आहे.