भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारणार – मंत्री उदय सामंत

भारतरत्न लता मंगेशकर यांना महाविकास आघाडी सरकारकडून अनोख्या पद्धतीने श्रध्दांजली वाहण्यात आली, लता मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाच संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय उभारण्याचे ठरवले होतं, परंतु दोन दिवसांपूर्वी लता दिदींचे निधन झाले. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे महाविद्यालय उभारले जाणार आहे. त्या महाविद्यालयाला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे नाव दिले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने काम करण्याची सूचना देखील दिल्या. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *