आ. नितेश राणे यांना जामीन मंजूर
भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे यांच्या तब्येत खराब झाली होती.
यामुळे त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. आज जामीन मंजूर झाल्याने राणी कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत.
नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तपास यंत्रणेत कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.