खा संजय राऊत यांचं “सत्यमेव जयते ” ट्विट आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूना लिहल पत्र
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील अनेक नेत्यावर ईडीचे धाड सत्र सुरू आहे. गेल्या आठवड्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत याच्यावर देखील ईडीने कारवाई केली आहे.
तसेच प्रवीण राऊत यांना १ हजार ३४ कोटी रुपये जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी दरम्यान सहकार्य न केल्याने अटक देखील करण्यात आली आहे. यापूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत याना देखील ईडी कडून नोटीस आली होती.
सत्यमेव जयते.. pic.twitter.com/ImdX7wPuYa
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2022
खा.संजय राऊत यांनी सत्यमेव जयते असं सूचक ट्वीट करून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू याना पत्र लिहल आहे.
“ईडी आणि इतर एजन्सींनी खासदार, त्यांचे नातेवाईक, मित्र यांच्या विरोधात सत्तेचा गैरवापर/दुरुपयोग यांना उद्धृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. खा. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कारवाई करण्याची विनंती केली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू याना लिहिलेलं पत्र ट्विट करण्याआधी संजय राऊत यांनी डरकाळी देत, समोरच्या कडे रागाने पाहणारा वाघाचा फोटो ट्वीट केला आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1491100740936675328?t=TjZ7ebDVRfiWZGYqkaWfyQ&s=19