कर्नाटकात हिजाबवरून वातावरण तापलं, तीन दिवस शाळा महाविद्यालय बंद

हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना एका महाविद्यालयाने मंगळवारपासून प्रवेश बंदी केली. हिजाब घालूनच महाविद्यालयात येऊ अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतली होती.

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या वर्गांना हजरी न लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे विद्यार्थीना पियू महाविद्यालयाने सांगितले. मात्र हिजाब घालता वर्गात येण्यास त्यांना नकार दिला.
हिजाब घालूनच वर्गात प्रवेश करणार असा हट्ट या विद्यार्थिनींचा होता मात्र प्राध्यापकांनी यापुढे हिजाब घालून महाविद्यालयात वर्गात बसू देणार नाही अशी भूमिका घेतली.

नेमकं काय आहे हिजाब आणि भगवी शाल वाद..?

कर्नाटक मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे यात एक मुलगी दुचाकी घेऊन कॉलेजच्या आवारात प्रवेश करते त्यावेळी त्याठिकाणी जमलेले जमावाने भगवी शाल घेऊन बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी समोर घोषणाबाजी करताना दिसत आहे.

यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी विद्यार्थिनींच्या याचिकेवर न्यायमुर्ती कृष्णा दिक्षित म्हणाले की, आम्ही कायद्याचं पालन करू संविधान जे सांगेल तेच आम्ही करू सविधान आपल्या सर्वांसाठी भगवद्गीता.  कारण उद्या दुपारी अडीच वाजता ते कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. या प्रकरणात होणारा निर्णय सर्व याचिकाना लागू राहील मुस्लिम विद्यार्थ्यांची बाजु वकील देवेंद्र कामत यांनी मांडली यावेळी सरकारच्या वतीने राज्याचे महाधीवक्ता सुनावणीत सहभाग होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *