महाराष्ट्र

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून ऑनलाईन असे करा डाउनलोड.?

Share Now

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार असून दहावीची परीक्षा १५ मार्च पासून आणि बारावीची परीक्षा ४ मार्च पासून होणार आहेत. बारावी

बोर्डाची हॉल तिकीट उद्यापासून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर वर विद्यार्थ्यांना मिळतील, तसेच हॉल टिकीट मिळवताना काही अडचणी आल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा आहे. त्यासोबतच परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने काढताना विद्यार्थ्यांनी कोणतेही शुल्क न घेता हॉल टिकीट ची प्रिंट मिळणार आहे, यावर मुख्याध्यापक प्राचार्य यांचा शिक्का आणि सही करावी विशेष सूचना देण्यात आली.

ऑनलाइन हॉल टिकीट विभागीय मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना प्रिंट करून विद्यार्थ्यास द्यायचे आहे. हॉल तिकीटमध्ये विषय आणि माध्यम संदर्भात काही दुरुस्ती असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यायाने विभागीय मंडळात जाऊन दुरुस्ती करून घ्यावी. अशी माहिती शासनाकडून देण्यात आली. हॉल तिकीटवर विद्यार्थ्याचे नाव, फोटो आणि सही या संदर्भात काही बदल असल्यास उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायला हवी. जर विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट हरवले तर महाविद्यालयाने पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा लिहून हॉल तिकीट देणे अनिवार्य आहे.

4 मार्च इंग्रजी
5 मार्च हिंदी
7 मार्च मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगू, पंजाबी, तमिळ
8 मार्च संस्कृत
10 मार्च फिजिक्स
12 मार्च केमिस्ट्री
14 मार्च मॅथेमॅटिक्स
17 मार्च बायोलॉजी
19 मार्च जिओलॉजी
9 मार्च ऑर्गनायझेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंट
11 मार्च सेक्रेटरी प्रॅक्टिस
12 मार्च राज्यशास्त्र
12 मार्च अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
14 मार्च अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
19 मार्च अर्थशास्त्र
21 मार्च बुक कीपिंग अंड अकाऊंतन्सी
23 मार्च बँकिंग पेपर 1
25 मार्च बँकींग पेपर 2
26 मार्च भूगोल
28 मार्च इतिहास
30 मार्च समाजशास्त्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *