भीमाची मुख्य भूमिका साकारणारे प्रवीण कुमार काळाच्या पडद्याआड

दूरदर्शनवरील लोकप्रिय असलेली मालिका महाभारत या मालिकेत भीमाची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार यांचं निधन झाले आहे. दिल्लीतील राहत्या घरी त्यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं.

अभिनेते प्रवीन कुमार केवळ अभिनयचं नाही तर उत्कृष्ट खेळाडू देखील होते. प्रवीण कुमार यांनी सत्तरच्या दशकात मनोरंजन विश्वात आपले पदार्पण केले.

प्रवीण कुमार यांचा जन्म पंजाब अमृतसर मध्ये झाला. त्यांनी १९६६ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकले होते, त्यानंतर एशियन स्पर्धेमध्ये दोन वेळा गोल्ड मेडल देखील पटकावले आहे.

अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी अथेलेटीक्स प्रवीण कुमार हॅमर आणि डिस्कस थ्रो अथेलेटिक होते. आशियाई क्रिडा स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण एक रौप्य एक कास्य अशी पदके जिंकली होती. प्रवीण कुमार अर्जुन पुरस्कार विजेते देखील आहेत.

अभिनय क्षेत्रातली पहिली भूमिका रविकांत नागाई यांनी दिग्दर्शित केली होती ज्यात त्यांच्याकडे कोणतेही संवाद नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *