आ. नितेश राणे यांना कोल्हापूरला हलवले, जामीन अर्जावर आज सुनावणी
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे चांगलेच गोत्यात आले आहे. नितेश राणे यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यंत चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावली होती. तसेच यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल अशी अपेक्षा असताना सोमवारी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे शासकीय सुट्टी असल्याकारणाने सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली. जामीन अर्जावर सुनावणी मंगळवार दि ८ रोजी होणार आहे.
याचदरम्यान पुन्हा त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी सकाळी नितेश यांच्या छातीत पुन्हा दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून सिंधुदुर्गातून कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर सध्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत असताना रुग्णालयात उपचार घेत आहेत.
एकीकडे नितेश राणेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असतानाच दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या संदेश ऊर्फ गोटय़ा सावंत यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. न्यायालयाने सोमवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
तसेच १० दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण देत या अवधीत दिवाणी न्यायालयात स्वतःहून हजर राहा, असा सक्त आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.