अनिल परब यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
अनिल परब यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवन्यात आला आहे. प्रशिक्षणार्थ्याचं अनिल परब यांच्या घरावर आज आंदोलन करणार आहेत. यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. २०१९ साली उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण झाली परंतु त्यांना अजूनही महामंडळाने नियुक्ती दिलेली नाही. या आंदोलकांकडून त्वरित कामावर घेण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
एसटी महामंडळाने २०१९ ला प्रक्रिया पूर्ण करूनही प्रशिक्षणार्थ्यांना भरती करण्यात आले. मात्र तरीही त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती अशा १८०० प्रशिक्षणार्थी आंदोलकांकडून कामावर घेण्याची मागणी केली जाते आहे. आंदोलकांमध्ये सहाय्यक, चालक, वाहक आणि टेक्निशियन यांचा समावेश आहे. यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील वांद्रे घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.