सोमवारपासून पुण्यातील पहिले ते आठवी शाळा पूर्णवेळ भरणार – अजित पवार
फेब्रुवारीपासून बहुतांश जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून. पुण्यातही शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ सुरू नव्हत्या . आता मात्र शाळा ७ फेब्रुवारी पासून पूर्ण वेळ सुरू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यातील सक्रिय कोरोना रुग्णाची संख्या बरीच आहे. त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
तसेच पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमधे कोणताही घोटाळा झाल्याचे आरोप विरोधकांनी केला होता, त्याला अजित पवार यांनी फेटाळूनन लावले. यात कुठलाही घोटाळा नाही
विरोधी पक्षातील लोक आरोप करतात, पण पुढे त्याच काय होतं. अनेकदा माफी मागुन मोकळे होतात असे अजित पवार म्हणाले.
सुशील खोडवेकरला टी ई टी परिक्षेतील गैरव्यवहारात अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यानी याची माहिती घेतली आहे. माहिती घेणं हे मुख्यमंत्र्यांचे काम असल्याचे पवार यांनी सांगितले. पुण्यातील येरवडा भागातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. तसेच या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देखील या अपघाताबाबत अहवाल देण्यास सांगण्यात आल्याचे पवार म्हणाले.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे पण मृत्यूच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. पुण्यात, राज्यात, देशात आणि जगात हा ट्रेंड दिसून येतोय. ५ ते १८ वयोगटातील मुलांना देण्यासाठी जेवढी लस हवी तेवढी उपलब्ध नाही. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, जंबो कोवीड सेंटर सध्या उभे आहे, पण त्यामधे रुग्ण नाहीत. मात्र, तरीही २८ फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ कारण त्यासाठी भाडे द्यावे लागते असे पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना संपला असे अद्याप म्हणता येणार नाही. कारण अजूनही ४५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
All schools for all classes in the Pune district are allowed to open full day (regular hours) from Monday, 7th February: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/Hqaowrz8YP
— ANI (@ANI) February 5, 2022