क्राईम बिट

धक्कादायक ! महिलेवर तिच्या मुलासमोर बलात्कार

Share Now

औरंगाबाद :- औरंगाबाद शहरात घडली धक्कादायक घटना, महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने
दोन महिने बलात्कार केल्याची घटना समोर आली. बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी संभाजी आसाराम शिंदे याने मुलाला कंपनीत नोकरीला लावून देतो अशी थाप मारून दोन महिने महिलेला क्रांती चौक परिसरातील खोलीमध्ये डांबून दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे , एका महिलेसह तिच्या मुलाला कंपनीमध्ये कामाला लावून देण्याचे आमिष देण्यात आले . या महिलेला २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मुकुंदवाडी भागातील रेल्वे गेट नंबर ५६ येथे बोलावून घेतले होते. तेव्हा कंत्राटदार संभाजी शिंदेने महिलेसह मुलाला एका रिक्षामध्ये बसवून त्या दिवशी शेंद्रा एमआयडीसी येथील एका कंपनीमध्ये काम दिले.
काम संपल्यानंतर महिलेला आणि मुलाला घरी सोडतो असे सांगून स्वतःच्या गाडीत बसवले. घरी न सोडता थेट क्रांती चौक परिसरातील खोलीवर नेले.

यानंतर एका खोलीमध्ये महिलेवर आरोपी संभाजी शिंदे आणि त्याचा एक मित्र जवळपास या महिलेवर २ महिने बलात्कार करत होते. त्याचबरोबर महिलेच्या १४ वर्षाच्या मुलाला दुसऱ्या खोलीत डांबून मारहाण करण्यात आली. या महिलेने १५ जानेवारी रोजी शिंदे यांच्या तावडीतून मुलाने कशीबशी सुटका करून घेतली होती. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस गुन्हा दाखल झाला होता. त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *