मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाने मुख्याध्यापकावर केला तलवारीने हल्ला

औरंगाबादच्या कन्नड शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडलीय. कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील मुलींची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारला म्हणून मुख्याध्यापकासह शिपायावर तलवारीनं हल्ला केल्याची घटना उघडकीस आलीय. या हल्ल्यात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. तर, हल्लेखोर तरुणाचा शोध सुरू आहे.

कन्नड तालुक्यातील कारखाना परिसरात काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेत मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला समजावून सांगणाऱ्या मुख्यध्यापकावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे मुजीब जलील शेख हा मक्रणपूर येथूल रहिवासी आहे. हा तरुण शाळा सुटल्यानंतर दररोज मुलीची छेद काढत असतो या संदर्भात मुलींनी मुख्यध्यापक ए पी चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. यावर आज शाळा सुटल्यानंतर चव्हाण यांनी मुजीब यास जाब विचारल्याचा राग मनात धरून मुजिबने मुख्याध्यापक चव्हाण यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *