अल्पवयीन मुलीवर मामानेच केला बलात्कार, ‘या’ कारणाने प्रकरण आलं समोर
अभ्यास घेण्याच्या कारण देऊन मामानेच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याची घटना साताऱ्यातील वाई तालुक्यात घडली आहे. पीडितेने दिलेल्या जवाबनुसार वाई पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार मामा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मामला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
सदरील घटना ऑक्टोबर महिन्यात घडली असून पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर पीडितेच्या घरच्यांना याची माहिती झाली. संबंधित अल्पवयीन पीडितेचा अभ्यास घेण्याच्या कारण देत मामाने भाचीवर अनेकदा अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. सर्वात आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये या व्यक्तीने आपल्याच भाचीवर बलात्कार केला. तसेच ही घटना कोणाला न सांगण्याची धमकी देत पुन्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तिच्यावर अत्याचार केला.
मुलीला त्रास होऊ लागल्याने घरच्यांनी पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ती गरोदर असल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी मामाला गावातून अटक केली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करत आहेत.